लघु उद्योजकांनी हिमतीने पूढे जात रहायला पाहीजे, शुन्यातून सुरु केलेला प्रवास विस्तीर्ण होतो – सुभाष देसाई

Foto

औरंगाबाद– लघु उद्योग विकासासाठी शासन सर्वोतोपरी कृतीशील असून लघु उद्योजकांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या भांडवल उभारणी, पायाभूत सुविधा, इतर सर्व बाबी शासनस्तरावरुन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे शासन योजनांचा सर्व लघु उद्योजकांनी लाभ घेऊन धाडसाने पूढे जात रहायला पाहीजे असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज (ता.१५) केले.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागसेन वन येथे केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम मंत्रालय व उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबादच्या वतीने आयोजीत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी तीन दिवसीय उद्योजक विकास परिषद व औद्योगिक उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.चंद्रकांत खैरे,उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदिप कांबळे, उद्योजक श्रीकांत बडवे,बीमॅटचे सिद्धार्थ जाधव,कार्यकारी संचालक, एमसीइडी तथा उद्योग सहसंचालक ब.सु. जोशी,प्राचार्य अभिजीत वाडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सुभाष देसाई यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

राज्याच्या औद्योगिक प्रगतीत मोठ्या उद्योगमसमूहांसोबतच लघुउद्योगांचे स्थान देखील महत्वपूर्ण आहे.

केंद्र तसेच राज्य शासनाने उद्योग विभागाच्या माध्यमातुन लघुउद्योजकांसाठी अनेक उपयुक्त योजना सुरु केल्या आहेत.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत अनुसुचीत जाती जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी या तीन दिवसीय उद्योजक विकास परिषद व औद्योगिक उत्पादनांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लघु उद्योजक हा खूप उत्साही,नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा आहे.त्याच्या या प्रयत्नांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे शासनाचे महत्वाचे काम आहे.

मोठ्या उद्योगांच्या विस्तारासोबत लघुउद्योजकांना मोठे करणे ही आवश्यक आहे.हे लक्षात घेऊन शासन प्रयत्नशील आहे.

लघु उद्योजकांना एमआयडीसीत हजार स्वे.फुट,दोन,पाच हजार स्वे.फुट असे बांधीव गाळे भाडेतत्वावर किंवा दिर्घ मुदतीसाठी देण्यात येणार आहे.नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ,नवीन उद्योग ,स्टार्टपसाठी शासन प्राधान्याने सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करुन देत असून याचा शेकडो उद्योजकांना लाभ होत आहे.

खा.चंद्रकांत खैरे यांनी यावेळी शासनाच्या उद्योग वाढीच्या धोरणातंर्गतचा हा स्त्युत उपक्रम असून उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा ,असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदिप कांबळे यांनी या परिषदेत एससी, एसटी प्रवर्गातील उद्योजकांच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने परिषदेत उद्योजकांच्या क्षमता वृद्धीसाठी नामांकित संस्था, उद्योजकांचे मार्गदर्शन होणार आहे. शासनाच्या खरेदीप्रक्रियेत एससी, एसटी प्रवर्गातील उद्योजकांचा सहभाग वाढविणेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाव्दारे सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी व्यावसायिक ते व्यावसायिक, व्यावसायिक ते ग्राहक बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक उपक्रम ज्यामध्ये रेल्वे, हिंदुस्थान एरोनोटीक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर, बी पी सी एल, महाजेनको, राज्य परिवहन महामंडळ आदी नामांकित शासकीय उपक्रम व नामांकित उद्योग घटक यामध्ये सहभागी होणार आहेत. परिषदेत एससी, एसटी प्रवर्गातील 100 हुन अधिक उद्योजक त्यांची उत्पादने, सेवा प्रदर्शित करण्यात येत असून सहभागी उद्योजकांसाठी सिपेट, आयजीटीआर, ऑटो क्लस्टर, रबर क्लस्टर आदींना भेटी व चर्चा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती दिली.

 दि. १५ ते १७ नोव्हेंबर या तीन दिवसीय परिषदेत राज्यातील एससी, एसटी प्रवर्गातील ४०० ते ५०० उद्योजक सहभागी असून परिषदेसाठी बुद्धीस्ट इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर आणि ट्रेडर्स असो. (BMAT), दलित इंडिअन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज (DICCI), औरंगाबाद, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज असोशिएशन (CMIA) मासिआ, औरंगाबाद आणि वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशन (WIA) कॉन्फेडरेशन ऑफ इंडिअन इंडस्ट्री (CLL), यांचा सक्रीय सहभाग आहे.

 कार्यक्रमाचे आभार ब.सु. जोशी, कार्यकारी संचालक, एमसीइडी तथा उद्योग सहसंचालक, औरंगाबाद विभाग, यांनी व्यक्त केले.